बंगालमधील हिंदूवरील हिंसाचाराविरोधात राष्ट्रपती राजवटीची मागणी

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
 लोकशाही पद्धतीने राज्यसभेत व लोकसभेत वक्फ विधेयक मंजुरीनंतर पश्चिम बंगाल मध्ये सुरू झालेला हिंदू वरील हिंसाचार अधिकच तीव्र होत आहे. हा केवळ विरोध नसुन एक प्रकारची क्रूर चिथावणी आहे. याच क्रुर मानसिकतेला आपले अनेक हिंदु बांधव बळी पडत आहेत. त्यांचे संरक्षण व्हावे, हिंदु विरोधी जेहाद्यांना आळा बसावा आणि अकार्यक्षम बंगाल सरकार बरखास्त होऊन तिथे राष्ट्रपती राजवट लागु व्हावी या प्रमुख मागणीचे निवेदन महामहिम राष्ट्रपती यांना देण्याकरिता दिनांक १९/०४/२०२५ ला विश्व हिंदु परिषदेच्या माध्यमातून तहसीलदार ब्रम्हपुरी यांच्याद्वारे देण्यात आले..
 यावेळी शेष मंदिरामधून पायदळ निघून इंदिरा गांधी चौक ते तहसील कार्यालय या ठिकाणी घोषणा करीत तहसीलदार यांना निवेदन दिले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे विभाग संघचालक जयंतराव खरवडे, विहिप जिल्हा उपाध्यक्ष राजुजी आबदेव, विश्व हिंदु परिषद जिल्हा मंत्री रोशन नवघडे, विहिप नगर अध्यक्ष अमितजी मेंडूले, भाजपा शहर अध्यक्ष अरविंद नंदुरकर यांचे हस्ते व सकल हिंदू समाजाचे वतीने तहसीलदार ब्रम्हपुरी यांना निवेदन देण्यात आले. 
 यावेळी रा.स्व.संघ, विहिपं, बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गा वाहिनी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजपा, धर्मध्वज, आसाराम बापू परिवार, गायत्री परिवार, शिवजयंती उत्सव समिती, विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक संस्थांचे हिंदू बांधव, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

  Post Views:   37



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी