आयसीओ व ‘आयएमओ’ स्पर्धा परिक्षेत एलएमबी पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

   


ब्रम्हपुरी/का.प्र. :-
 दरवर्षी एल. एम. बी. पब्लिक स्कुलमध्ये SOF मार्फत ऑलम्पियाड परिक्षा घेण्यात येतात. यावर्षी सुद्धा SOF, International Computer Science Olympiad Exam मध्ये ६ विद्यार्थी तर International Maths Olympiad मध्ये ५० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलेले आहे. 
 SOF अंतर्गत घेण्यात येणार्याi इंग्रजी, विज्ञान, गणित, संगणक ज्ञान या विषयात २०२४-२०२५ च्या परिक्षेत उतुंग यश प्राप्त केले. या स्पर्धेत एल. एम. बी. स्कुलमधील वर्ग १ ते १० वी च्या विद्यार्थ्यांना सर्व विषयाच्या सखोल ज्ञान व्हावे, जेणेकरून पदवी नंतरच्या स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यास सोपे जावे. हा या परिक्षेमागील खरा उद्देश आहे. अलीकडच्या काळात स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर आयटी आणि संगणकाचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. या हेतूला साध्य करण्यासाठी एल. एम. बी. पब्लिक स्कुलमधील शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांकरिता सदैव प्रयत्नरत असतात. त्याचेच फलित म्हणून २०२४-२५ च्या ऑलिम्पिआड स्पर्धेत स्कुलच्या अनेक विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्राप्त केले. 
 पदक प्राप्त विद्यार्थ्यांना शाळेच्या संचालिका अशिता भैया मॅडम, मुख्याध्यापक कादिर कुरेशी सर यांच्या हस्ते मेडल, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. अशाप्रकारे विविध र्स्प्धांचे आयोजन करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला, विचारांना व सृजनशिलतेला वाव मिळत आहे.

  Post Views:   452



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी