ब्रम्हपुरी तालुक्यात बळीराजा शेतपांदन रस्ता रखडला

मस्टर मंजूरीसाठी प्रमोद चिमूरकर यांचे तहसिलदारांना निवेदन
   



ब्रम्हपुरी/प्रतिनिधी
 ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकर्यां साठी अत्यंत महत्त्वाचा असलेला शेत पांदन रस्ता अजूनही अर्धवट अवस्थेत पडून आहे. सदर रस्त्याचे काम थांबण्यामागील प्रमुख कारण म्हणजे मस्टर मंजुरी न मिळणे होय. पांदन रस्ते तयार झाले नसल्याने शेतकर्यांरना आपल्या शेतापर्यंत जाण्यास अडथळा निर्माण होणार असून, येणार्याव पावसाळ्यात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर यांनी तहसीलदार ब्रम्हपुरी यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून मस्टर मंजुरी तातडीने देण्याची मागणी केली आहे.
 चंद्रपूर जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत बळीराजा शेत पांदन रस्त्याचे काम ई-निविदा प्रक्रियेद्वारे मंजूर करण्यात आले होते. काम सुरू करण्याचे आदेश ऑगस्ट व नोव्हेंबर महिन्यांत देण्यात आले. मात्र, पावसाळा आणि शेतात पिके असल्यामुळे बळीराजा शेत पांदन रस्त्याचे काम सुरू होऊ शकले नाही. नंतर नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत मस्टरच्या आधारे काही प्रमाणात काम झाले. परंतु अचानक मस्टर मंजुरी बंद झाल्यामुळे रस्त्याचे काम पुन्हा थांबले.
 या प्रलंबित रस्त्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर यांनी मा. आयुक्त (मनरेगा), नागपूर यांच्याकडे पत्र पाठवले असून, त्यामध्ये काम सुरू ठेवण्यात येत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र ब्रम्हपुरी तालुक्यात बळीराजा शेत पांदन रस्त्याचे काम बंद आहे. सध्या उन्हाळ्याचा १ महिना राहिला असून पावसाळा तोंडावर आहे. अशा वेळी रस्ता पूर्ण न झाल्यास शेतकर्यां ना त्यांच्या शेतीसाठी जाण्यात अडचणी येणार आहेत. तसेच रोहयो योजनेला गती देण्याकरीता काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी प्रमोद चिमुरकर यांनी निवेदनात केली आहे.

  Post Views:   16



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी