नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात अग्निशामक प्रात्यक्षिक
१५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
ब्रम्हपुरी:-
नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथील रसायनशास्त्र विभागात अग्निशामक प्रात्यक्षिक व सुरक्षा जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अग्निशामक यंत्राचे प्रकार, विविध वर्गातील आगींची ओळख, तसेच अग्निशामक यंत्र वापरण्याची क्रमवार पद्धत (Pull–Aim–Squeeze–Sweep) याबाबत माहिती देण्यात आली. तसेच प्रयोगशाळा व क्षेत्रीय काम करताना घ्यावयाच्या सुरक्षा खबरदारीविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाचे मार्गदर्शन डॉ. के. एस. नाकतोडे, सहाय्यक प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग यांनी केले. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देत मैदानावर हाताळणी प्रात्यक्षिक करून दाखवले. यामध्ये सुमारे १५० विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वाय. पी. ठावरी, विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी डॉ. डी. एन. उराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. ए. पी. पवार यांनी केले. तसेच श्री. आलोक मेश्राम, अक्षय चहांदे व संजू मेश्राम यांनी विशेष सहकार्य केले.
अशा प्रकारच्या प्रात्यक्षिकांमुळे महाविद्यालयीन परिसरात सुरक्षा जनजागृती वाढून आपत्ती हाताळण्याची तयारी बळकट होते, असे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.