एन. एच. जूनियर कॉलेज ब्रह्मपुरी इयत्ता ११ वी प्रवेशोत्सव २०२५-२६ मध्ये उत्साहात साजरा.

   


ब्रम्हपुरी:-
नेवजाबाई भैया हितकारिणी एज्युकेशन सोसायटीच्या एन. एच. जूनियर कॉलेज, ब्रह्मपुरी येथे इयत्ता ११ वीचा प्रवेशोत्सव २०२५-२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय श्री. अशोकजी भैय्या, सचिव, एन. बी. एच. एज्युकेशन सोसायटी, यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे कार्यकारी प्राचार्य डॉ. एस. एम. शेकोकार होते. तसेच, एन. एच. जूनियर कॉलेजचे पर्यवेक्षक श्री. आनंद भोयर आणि प्रा विनोद नरड, व कनिष्ठ महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक वृंद यांची उपस्थिती लाभली. प्रवेशोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना नव्या शिक्षणप्रवासासाठी शुभेच्छा देत, शिक्षणात नवे तंत्रज्ञान आणि आधुनिक मूल्यांची कशी सांगड घालावी, याबाबत मार्गदर्शन केले. कॉलेजच्या यशस्वी परंपरेचा मागोवा घेत, नवगत विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन गुणवत्ता आणि शिस्तीचा आदर्श निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले. एन. एच. जूनियर कॉलेज ब्रह्मपुरी ही संस्था प्रगत शिक्षण पद्धतीसाठी ओळखली जाते आणि यंदाही नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रेरणादायक वातावरणात झाली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. राहुल मोहुलें यांनी आणि प्रा. कोमलकांत ठोबरे यांनी आभार व्यक्त केले.

  Post Views:   157




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी