साई मंदिरात ५ एप्रिलपासून साई उत्सव
ब्रम्हपुरी/का.प्र.
येथील विद्यानगर स्थित साई देवस्थान येथे दि. ५ ते ७ एप्रिल दरम्यान श्री साई उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
० ५ एप्रिल ला दुपारी ४ वाजता साई देवस्थान पासून श्री च्या पालखीची मिरवणूक शहरातील मुख्य मार्गांवरून काढण्यात येणार आहे. तर ०६ एप्रिलला साई देवस्थान येथे सकाळी १० वाजतापासून रामजन्माच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ०७ एप्रिल ला दुपारी २ वाजता ह. भ. प. सविताताई खरवडे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित असून त्यानंतर काल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ६ ते ९ दरम्यान मंदिर परिसरात महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री साई देवस्थानचे अध्यक्ष नंदू पिसे, सचिव महेश पिलारे, पिंटू समर्थ, ऋषिजी चुर्हे, शरद ठेंगरी, पराग कुंभारे, मनोज हेमके, नितेश समर्थ, प्रमोद बांगरे, राहुल हेमके, मामाजी वझाडे, नितीन ब्राम्हणकर, श्रुत कुंभारे, साहिल नाकतोडे यांनी केले आहे.