एनसीसी छात्रांचा निरोप समारंभ व सत्कार सोहळा

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
 नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रह्मपुरीच्या एनसीसी युनिटतर्पेâ सत्र २०२४–२५ करिता भव्य व भावपूर्ण निरोप समारंभ आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन स्व. मदनगोपालजी भैया सभागृहात करण्यात आले. या कार्यक्रमात वरिष्ठ एनसीसी कॅडेट्सच्या कामगिरीचे आणि उत्कृष्ट कामगिरी करणार्याग विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
 कार्यक्रमाची सुरुवात लेफ्टनंट अभिजीत एस. परकरवार यांच्या प्रस्तावनेने झाली. त्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. एनसीसी कॅडेट्समध्ये शिस्त, सेवा आणि नेतृत्वगुण रुजविण्यात येणार्यास मूल्यांचे त्यांनी विशेष उल्लेख केले तसेच कॉलेज व एनसीसी बटालियनच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. डी. एच. गहाणे, प्राचार्य, एन.एच. कॉलेज यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकजी भैया, कर्नल व्ही. सी. शर्मा, कमांडिंग ऑफिसर, २० महाराष्ट्र बटालियन एनसीसी, नागपूर हे उपस्थित होते.
 कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. एस.एम. शेकोकार, डॉ. वरभे, प्राचार्य, शांताबाई भैया महाविद्यालय, ब्रह्मपुरी, कॅप्टन डॉ. कुलजीत कौर गिल, कॅप्टन प्रा. अभिजीत परकरवार, केयर टेकर प्रा. रेवनदास बोरकर यांचीही प्रेरणादायी व गौरवशाली उपस्थिती होती. या कार्यक्रमात एन.सी.सी. मधिल उल्लेखनीय कामगीरीबद्दल डिम्पल पाथोडे, रोहिणी हजारे आणि पायल सहारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच थर्ड ईयर सीनियर कैडेट्सला सुद्धा स्मृति चिह्न देऊन गौरविण्यात आले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट प्रियशील चंदनखेडे आणि कॅडेट आरती भानारकर यांनी केले. तसेच कॅडेट सुहानी देशमुख हिने सर्व मान्यवर, सहभागी आणि योगदान देणार्यां चे आभार मानले.

  Post Views:   72



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी