SSC परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थिनींची अभिनंदन व गुणगौरव सोहळा

   

ब्रम्हपुरी:-
        स्थानिक ने हि कन्या विद्यालय ब्रम्हपुरी येथे दिनांक 16 मे 2025 ला एस एस सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनींची सत्कार करण्यात आला. यावेळी 
 नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव श्री. अशोकजी भैय्या साहेब, मुख्याध्यापिका सौ. पी व्ही बनपुरकर मॅडम उपमुख्याध्यापक श्री निखारे सर, पर्यवेक्षिका सौ. खंडाते मॅडम सौ दलाल मॅडम, पालक प्रतिनिधी श्री गरुडेश्वर पडोळे व पालक वर्ग उपस्थितीत होते.       
विद्यालयाचा इयत्ता 10 बोर्ड परीक्षेचा निकाल 94.78 टक्के लागला असून विद्यालयाने ब्रह्मपुरी तालुक्यातून उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा कायम राखली आहे. 
         विद्यालयातून सेमी इंग्रजी माध्यमातून प्रथम आलेली कु विद्या गरुडेश्वर पडोळे, द्वितीय कु. भार्गवी वासुदेव हटवार, तृतीय कु. दिव्यांनी ओमप्रकाश ठेंगरे, चतुर्थ कु. गाथा उद्धव फुलझेले व कु. माही चंद्रशेखर पेलणे, पाचवी कु. तोषवी सुरपाम तसेच मराठी माध्यमातून प्रथम कु. श्रेया नंदलाल पिलारे , द्वितीय कु. अदिती मदन गुरपुडे या सर्व विद्यार्थिनींची सत्कार करण्यात आला.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री निखारे सर यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पी व्ही बनपुरकर मॅडम यांनी निकालाची माहिती दिली. श्री.अशोकजी भैय्या साहेबांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात स्पर्धात्मक युगात आपण कशा प्रकारे वाटचाल करायची याविषयी मार्गदर्शन केले व विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. 
       कार्यक्रमाचे संचालन सौ शेंडे मॅडम व आभार सौ नगराळे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी सहकार्य केले.

  Post Views:   81



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी