प्रथम नगराध्यक्ष अशोक भैया यांनी घेतली भेंडारकर कुटुंबीयांची सांत्वनापर भेट
ब्रह्मपुरी
चंद्रपूर जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष, प्रसिद्ध विधिज्ञ, अखिल भारतीय काँग्रेस ओबीसी विभागातील पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ब्रह्मपुरी विधानसभा माजी अध्यक्ष, माजी सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अशी बहुआयामी ओळख असलेले ॲड. गोविंद बाबुराव भेंडारकर यांचे नुकतेच निधन झाले. ब्रम्हपुरी नगर पालिकेचे प्रथम नगराध्यक्ष तथा उद्योजक अशोकजी भैया यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली, व भेंडारकर कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भेंडारकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.