तब्बल २५ वर्षांनी रंगला आठवणींचा स्नेहमिलन सोहळा

एकत्र येत दिले एकमेकांना मदतीचे आश्वासन
   

ब्रम्हपुरी/का.प्र.
डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय ब्रम्हपुरी येथे सन १९९९-२००० च्या १० वी बॅचने तब्बल २५ वर्षानंतर आपल्या शिकत असतानाच्या पुर्वीच्या आठवणींना उजाळा देणारा मैत्रीचा स्नेहमिलन सोहळा पार पाडुन एक आदर्श निर्माण केला. 
ब्रम्हपुरी पासुन ३ किमी अंतरावर असलेल्या दुधवाही येथील निसर्गरम्य वातावरणातील फार्म हाऊस वर हे आयोजन करण्यात आले. २५ वर्षा पुर्वीच्या १० वी तील आठवणींना उजाळा देण्यासाठी सुरुवातीला व्हाट्सअप ग्रुप बनविण्यात येऊन सर्व क्लासमेट्स यांना एकसंघ बांधण्यात आले व त्यानुसार सर्व नियोजन आखण्यात आले.    
   स्नेहमिलन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी केशिप पाटील व लिलाधर वंजारी यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे तसेच आशिष नागदेवते, अमोल बागडे,  राकेश फुलझेले, वैशाली ठवरे, सुभाष बनकर, नरेश लोखंडे यांनी मोलाचे सहकार्य केले.शिवाय शरद बोरकर, सरोज मेंढे, गिरीधर गणवीर, प्रतिपाल हुमणे, चोखेश्वर रामटेके, राजेश लोणारे, धनपाल शेंडे, रविकांत राऊत, कैलास ढोक, भाग्यवंत लोणारे, क्रिष्णा वैद्य,विकास सांगोळकर, भागवत पचारे, सुरेश कोराम, शिल्पा बागडे, अर्चना मेश्राम, शुभांगी मेश्राम, दिक्षा रामटेके, रुपाली सैजारे, प्रमिला लोखंडे, सुजाता रामटेके, मुनेश्वर देवगडे, कृष्णकांत भागडकर, रजनीकांत कांबळे, रॉकेश कुरझेकर, सुरज रामटेके, मुन्ना बोरकर, धम्मा बनकर, राजेश रामटेके, राष्ट्रपाल मेश्राम आदिंनी सहभाग घेऊन स्नेहमिलन सोहळा पार पाडला.

  Post Views:   81



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी