मोबाईल चोरी करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात
ब्रह्मपुरी पोलिसांची कामगिरी..
ब्रह्मपुरी:
दिनांक 29/05/2025 रोजी फिर्यादी नामे सतीश लालदास गजभिये वय 57 वर्ष धंदा मोबाईल दुकान राहणार समता कॉलनी वडसा रोड ब्रह्मपुरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून, दिनांक 28 /5 /025 रोजी फिर्यादी दिवसभर मोबाईल दुकान चालवून स्वतःचे फ्लेक्स मोबाईल दुकान रात्री 9.00 वाजता बंद करून घरी गेले व दुसऱ्या दिवशी दिनांक 29 /5/ 25 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 9.00 वाजता मोबाईल दुकान उघडण्याकरता गेले असता दुकानाचे शटर वर उचललेले दिसले. तेव्हा फिर्यादी सतीश यांनी आपल्या मुलास सदर हकीकत सांगून दुकान चेक केले असता, दुकानातील जुने विक्रीकरिता ठेवलेले 11 अँड्रॉइड मोबाईल वेगवेगळ्या कंपनीचे किंमत 14,300 रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने शटर वाकवून चोरून नेला. फिर्यादीने पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे दिलेल्या तक्रारीवरून अपराध क्रमांक 237/25 कलम 303,331 (3) 331 (4) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर आरोपीचा सीसीटीव्ही फुटेज चे आधाराणे गुन्हेशोध पथकातील अंमलदार यांनी शोध घेत असताना, दोन मोटर सायकल वर एकूण 7 इसम हे रात्री दरम्यान फिरत असताना दिसून आले. त्यांचे सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करून शोध घेतला असता आरोपी 1) रंजीत खुशाल मेंढे वय 19 वर्ष राहणार उदापूर 2) सौरभ शिवलाल उत्तरमारे वय 21 वर्षे, 3) एकूण 05 विधी संघर्ष बालक राहणार ब्रह्मपुरी यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे आणण्यात आले आहे. आरोपी व विधी संघर्ष बालक यांच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेले एकूण 11 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल किंमत 14, 300 रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदरची कामगिरी मा .पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का सा. अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनात सहा. पो नि मनोज खडसे, पोहवा योगेश शिवणकर, पोहवा अजय कटाईत ,नापोअ मुकेश गजबे, पोशी स्वप्निल पळसपगार, चंदू कुरसंगे, निलेश यांनी केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहवा योगेश शिवणकर हे करीत आहेत