सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने प्रशासक राज संपणार
ब्रम्हपुरी/का.प्र.
सर्वोच्च न्यायालयाने तब्बल ३ वर्षानंतर दिलेल्या निर्णयाने स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणूकींचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या ०४ महिन्यात निवडणूक घेण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहे. गणेशोत्सवानंतरच निवडणूक होण्याची शक्यता आहे. २०२२ पूर्वीच्या ओबीसी लोकसंख्येच्या आधारावर निवडणूका घेण्यात येणार आहेत.
चंद्रपुर जिल्हयात एक जि.प., चंद्रपुर मनपा ब्रम्हपुरीसह भद्रावती, चिमूर, वरोरा, गडचांदूर, बल्लारपूर, राजूरा, मुल, नागभीड व घुग्गुस अशा १० नगरपालिका तसेच गोंडपिपरी, जिवती, कोरपना, पोंभुर्णा, सावली व सिंदेवाही अशा ६ नगर पंचायती आहेत.
०१ फेब्रुवारी २०२४ पासून ब्रम्हपुरी न.प.मध्ये प्रशासक राज सुरू आहे. न्यायालयाच्या निर्णयाने येत्या काही महिन्यातच प्रशासकराज संपून लोकप्रतिनिधींच्या हातात सत्ता येणार आहे. निवडणूक संदर्भातील निर्णयाने राजकीय नेते तथा कार्यकर्ते सक्रीय झाले आहेत. लवकरच मोर्चेबांधणीला सुरूवातदेखील होईल. याबाबत विविध मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया...