सरस्वती तर्वेकर महिला महाविद्यालयातील विद्यार्थीनींचे सुयश

   

नागभीड/प्रतिनिधी
आदर्श कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे राज्यस्तरीय डुएट डान्स कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालय नागभीडच्या विद्यार्थिनी संजना मुळे व मुन्नी दिघोरे या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता तेथील त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनाबद्दल त्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले. त्यांना सन्मान म्हणून प्रशस्तीपत्रक व गुलदस्ता देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच यादवराव पोशट्टीवार कला व विज्ञान महाविद्यालय तळोधी बाळापुर येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठ स्तरीय वत्तृâत्व स्पर्धेच्या आयोजनात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी पूजा वीर व विशाखा ठाकरे या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये त्यांना तृतीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्यांना रोख १००१ रुपये, प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह बहाल करण्यात आले. 
विद्यार्थीनींनी मिळविलेल्या यशाबद्दल समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रेखा जीभकाटे यांचेसह प्राध्यापक व कर्मचारी वृंदानी त्यांचे अभिनंदन केले आहे.

  Post Views:   76



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी