ब्रह्मपुरी पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सर्वसाधारण

   

ब्रह्मपुरी
जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज बुधवार 01 आक्टोंबर 2025 ला ब्रम्हपुरी पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण अखेर जाहीर झाले असून ब्रह्मपुरी पंचायत समितीचे सभापतीपद पद हे सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारासाठी राखीव करण्यात आले आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात होणार असून, गावखेड्यातील इच्छुक नेत्यांसाठी राजकीय संधीचे नवे दालन खुले झाले आहे.
आरक्षण जाहीर होताच संभाव्य उमेदवारांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. गाव खेड्यातील प्रभावी नेत्यांकडून मोर्चेबांधणीला वेग येणार आहे. यापूर्वीच पंचायत समितीच्या सत्ताधारी व विरोधी गटांनी या पदासाठी गुप्त हालचाली सुरू केल्या आहेत. आता अधिकृत आरक्षण जाहीर झाल्यामुळे स्थानिक नेत्यांनी आपल्या गटबांधणीला प्रारंभ केला आहे. सभापती पदासाठी सर्वसाधारण आरक्षण असल्यामुळे गावागावांतून विविध नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. कोणत्या पक्षाकडून कोणत्या उमेदवाराला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरक्षणाचा फायदा मिळवण्यासाठी पक्षांतर्गत चढाओढ होण्याची शक्यता देखील नाकरता येत नाही. राजकीय वर्तुळात सध्या "आता खरी कसोटी नेत्यांची" अशीच चर्चा रंगली असून पुढील काही दिवसांत मोर्चेबांधणी, बैठका, पक्षांतर व गटबाजी याला वेग येणार हे निश्चित झाले आहे.

               इच्छूकाची भाऊगर्दी वाढली‌

अनेक जण बऱ्याच दिवसापासून सभापती पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. मीच सभापती होणार असल्याचे गाव खेड्यात चित्र तयार होऊ लागले आहे.

  Post Views:   306




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी