ने.हि. महाविद्यालयात लघु उद्योगावर व्याख्यान
ब्रम्हपुरी/का.प्र.
ने. हि. महाविघालय ब्रम्हपुरी येथील गृहअर्थशास्त्र विभागात बुधवार, दि. २७/०३/२०२५ ला व्याख्यान व फॅशन डिझायनिंग कोर्सचे प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एच. गहाणे सर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सदस्य प्रा. केला सर, शांताबााई भैय्या महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्रा.डॉ. हर्षा कानफाडे, उपप्राचार्य डॉ. शेकोकर सर, तसेच कला शाखा विभाग प्रमुख डॉ. डांगे सर यांचेसह प्रमुख वक्ता प्रा. स्मिता कुडवे (समता फाऊंडेषन, फॅशन डिझायनींग प्रशिक्षक)उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहअर्थशास्त्र विभागाच्या प्रा.डॉ. सोनाली पारधी यांनी केले. शारदास्तवन व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
प्रमुख वक्ता प्रा. स्मिता कुडवे यांनी ‘‘ज्ञानाकडून उद्योगाकडे'' या विषयावर विदयाथीनींना मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, आपल्या कामात आवड, संयम खूप महत्त्वाचा असतो. आपले काम सुंदर कसे करता येईल आणि ग्राहकांचे समाधान कसे करता येईल यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा मौल्यवान संदेश त्यांनी विद्यार्थिनींना दिला. यावेळी फॅशन डिझायनिंग कोर्स पूर्ण केलेल्या विदयाथीनींना सर्टिफिकेट वितरीत करण्यात आले. प्रमुख अतिथींच्या मार्गदर्शनानंतर विदयार्थीनींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन कु. निकीता राऊत तर आभार प्रदर्शन कु. मयुरी मेंढे हीने केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा.डॉ. सोनाली पारधी, प्रा.डॉ अनिता बगमारे, प्रा. शितल पांचाळ यांचे मार्गदर्शनात बी. ए. प्रथम, द्वितीय व एम.ए. प्रथम वर्षाच्या विदयाथीनींनी परिश्रम घेतले.