पहलगाम हल्ल्यातील मृतकांना सर्वपक्षीय श्रध्दांजली

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
 भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर येथील पहेलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. त्या मृतांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम रिपब्लिकन पक्ष खोरीपा यांच्या वतीने स्थानिक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक येथे घेण्यात आला. रिपब्लिकन पक्ष खोरीपा महा.प्रदेश सरचिटणीस जीवन बागडे यांच्या अध्यक्षतेखाली श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम विविध पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी शोक संवेदना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये राजू भागवत भाजपा ओ.बी.सी. मोर्चा शहर, सुधाकर पोपटे काँग्रेस, रवी पवार काँग्रेस, राहुल भोयर पत्रकार तथा ओबीसी युवा नेते, पदमाकर रामटेके रिपब्लिकन पक्ष खोरीपा, डेव्हिड शेंडे समता सैनिक दल, नागेश चहांदे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अध्यक्ष जीवन बागडे यांनी अध्यक्षीय स्थानावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी नरेश रामटेक, नागेश फुले, रक्षित रामटेके, मनोज धनविज, मदन शेंडे, आशू हुमने, जयंत चहांदे, देवानंद कांबळे आदी विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

  Post Views:   58



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी