ब्रम्हपुरी पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी नेणाऱ्या जनावरांची सुटका, बोलेरो पिकअपसह ४.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

   

ब्रम्हपुरी:
       प्राण्यांवरील क्रूरता थांबवण्यासाठी ब्रम्हपुरी पोलिसांनी आज मोठी धाडस दाखवत गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. देऊळगाव परिसरातून बोलेरो पिकअपमध्ये अत्यंत निर्दयतेने कोंबून नेली जाणारी चार जनावरे पोलिसांनी सापळा रचून पकडली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
           आज दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे शोध पथक गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, देऊळगाव येथून एका वाहनातून गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने नेली जात आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी देऊळगाव रोडवरील श्री क्षेत्र वाघोबा देवस्थान तपाळ फाट्याजवळ शिताफीने सापळा रचला. संशयास्पद महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक MH 38 E 2610 थांबवून झडती घेतली असता, गाडीचा डाला ताडपत्रीने झाकलेला आढळला. ताडपत्री काढून पाहिले असता, आत ०४ गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, चारा-पाण्याची कोणतीही सोय नसताना क्रूरपणे कोंबलेले आढळले. या वाहतुकीसाठी आरोपींकडे कोणताही अधिकृत परवाना नव्हता. यात ०४ गोवंशीय बैल, महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन असा एकूण किंमत ४लाख ६० हजार रुपये चा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी गजानन श्रीराम गडदे (रा. खेर्डा, जि. हिंगोली), अरविंद नानाजी बुल्ले (रा. देऊळगाव, ता. ब्रम्हपुरी) या दोन आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
           ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक  ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी  दिनकर ठोसरे आणि पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहा. पोलीस निरीक्षक मनोज खडसे यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार मुकेश गजबे, पोलीस अंमलदार वशिष्ट रंगारी, प्रवीण भिवगडे, निलेश तुमसरे, इर्शाद खान आणि स्वप्नील पळसपगार यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली.

  Post Views:   556




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी