अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला

   


ब्रह्मपुरी 
       ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद चौक येथे एका हॉटेलात अज्ञात इसमाचा मृतदेह 30 एप्रिल ला सायंकाळी सहा वाजता आढळून आला. 
       शहरातील ख्रिस्तनांद रुग्णालया समोरील हॉटेल ( टपरी ) समोर सदर इसमाचा मृतदेह नीचपत अवस्थेत पडलेला दिसून येत असून, मृतदेहाच्या कानातून रक्त वाहत असल्याचे दिसून येते. सदर मृतदेह आढळून आल्यानंतर नागरिकांनी एकच बघायची गर्दी केली. सदर मृतदेह आढळून आल्याची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना देण्यात आली. ब्रह्मपुरी पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून करून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी येथे मृतदेह पाठवला आहे. सदर इसमाचे नाव अशोक सखाराम दांडेकर वय 45 वर्ष राहणार बामणी तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथील असल्याचे कळते.

  Post Views:   788



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी