विद्यापीठस्तरीय वत्तृâत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
संविधान अवताडे प्रथम, पुजा विर द्वितीय तर योगेश सिडाम तृतीय
ब्रह्मपुरी/का.प्र.
महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रह्मपुरी येथील आंबेडकर विचारधारा विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय लोकशाहीचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर विद्यापीठ स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित एन.एच. कॉलेज ब्रह्मपुरी, कर्मवीर महाविद्यालय मूल, गोविंदराव वारजुकर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागभिड, गंगाबाई तलमले कॉलेज ब्रह्मपुरी, जनता महाविद्यालय चंद्रपूर, डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार रात्र पाळी कॉलेज चंद्रपूर, कर्मवीर महाविद्यालय मूल, श्री सद्गुरु साईबाबा सायन्स अँड कॉमर्स कॉलेज आष्टी, चिंतामणी कॉलेज, घुग्घुस आणि इतर महाविद्यालयातीलविद्यार्थी संघानी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. स्पर्धेचे परिक्षण ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय रामटेके, ज्येष्ठ पत्रकार विजय मुळे आणि लेफ्टनंट सरोज शिंगाडे यांनी केले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक चिंतामणी कॉलेज, घुग्घुस येथील बी.कॉम. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी संविधान शरद अवताडे याने प्राप्त केला. द्वितीय पारितोषिक सरस्वती जयरामजी तर्वेकर महिला कॉलेज, नागभिड येथील बी.ए. प्रथम वर्षाची पूजा कृष्णाजी विर या विद्यार्थिनीने प्राप्त केला. तर तृतीय पारितोषिक कर्मवीर महाविद्यालय, मूल येथील बी.कॉम. तृतीय वर्षाचा विद्यार्थी योगेश अरुण सिडाम यांनी प्राप्त केला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा .तुफान अवताडे यांनी केले.