काँग्रेसचे योगेश मिसार नगराध्यक्ष पदावर विराजमान

   

ब्रम्हपुरी/महेश पिलारे
          विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने निवडणूकीत घवघवीत यश प्राप्त केले. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार योगेश मिसार हे प्रचंड बहुमताने नगराध्यक्ष पदाकरीता निवडून आले. यांचा पदग्रहन समारंभ शुक्रवारला नगर पालिकेतील सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. माधूरी सलामे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व नगराध्यक्ष पदाचे सुत्रे सोपविली.
               नुकत्याच पार पडलेल्या नगर पालिका निवडणूकीत काँग्रेस पक्षाने प्रचंड यश प्राप्त केले. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार योगेश बालाजी मिसार यांनी अभूतपूर्व यश संपादन केले. तसेच एकुण २३ नगरसेवकापैकी काँग्रेसने तब्बल २१ जागांवर विजय प्राप्त केला, व एकहाती सत्ता काबीज केली. 
            नगराध्यक्ष योगेश मिसार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, नगरसेवक, नागरिक, व नगर पालिकेतील प्रशासकीय कर्मचारी यांच्या सहकार्याने स्वच्छ, पारदर्शक, भ्रष्ट्राचारमुक्त प्रशासन देण्याकरीता कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. प्रसंगी नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. माधूरी सलामे यांनी शहराच्या सर्वांगीन विकासाकरीता सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासीत केले.
             सदर पदग्रहन कार्यक्रमाला तालुका काँगे्रस कमिटीचे तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, कृ.उ.बा.स.चे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमूरकर, डॉ.राजेश कांबळे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, माजी पं.स.सभापती नेताजी मेश्राम, डॉ. देविदास जगनाडे, इकबाल जेसानी व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदग्रहन समारंभाचे संचालन मंगेश बोंंद्रे यांनी केले, व उपस्थितांचे आभार मानले.

  Post Views:   1468




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी