ने. ही. विद्यालयाचे शिक्षक जे. पी. पराते यांचा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून गौरव

   

ब्रम्हपुरी - नेवजाबाई हितकारिणी विद्यालय, ब्रह्मपुरी येथील माध्यमिक विभागातील शिक्षक श्री. जयंत पराते यांनी आपल्या सर्जनशीलतेचा व दर्जेदार शिक्षणाची जाण याचा प्रत्यय देत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यातर्फे आयोजित "शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत" तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.

या यशस्वी सहभागाच्या निमित्ताने त्यांचा डाएट चंद्रपूर यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. पुलकित सिंग, डाएटचे प्राचार्य मा. राजकुमार हिवारे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) मा. निकिता ठाकरे मॅडम, तसेच उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. निवास कांबळे साहेब यांची उपस्थिती लाभली होती.

शिक्षण क्षेत्रात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची ही आणखी एक नोंद आहे. याआधीही ते नवेगाव पांडव येथील कार्यकाळात राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नाईक सर तसेच सर्व शिक्षकवृंद व पालकांनी श्री. पराते सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या या यशाने विद्यालयाच्या शैक्षणिक उज्वलतेत भर पडली आहे.

  Post Views:   90



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी