जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘एन.सी.सी. गर्ल्स युनिट’तर्फे वृक्षारोपण व प्रबोधन कार्यक्रम

   

ब्रम्हपुरी (प्रतिनिधी) – जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ने.ही. महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथील एन.सी.सी. गर्ल्स युनिट (३ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन, नागपूर) च्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर उपक्रमात एन.सी.सी. कॅडेट्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाअंतर्गत कॅडेट्सनी बोंडगाव तलाव परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या उपक्रमात “परिपत्र अर्थव्यवस्था व हरित हायड्रोजनची वाढती गरज” या अत्यंत समकालीन व महत्वाच्या विषयावर डॉ. हर्षा मुंगोले, सहायक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, शांताबाई भैय्या महिला महाविद्यालय, ब्रम्हपुरी यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यांनी सध्याच्या काळात पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, हरित ऊर्जा व चक्राकार अर्थव्यवस्थेची आवश्यकता यावर सखोल विवेचन केले. कार्यक्रमास कॅप्टन डॉ. कुलजीत कौर गिल यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कॅडेट्समध्ये देशभक्तीबरोबरच पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण झाली.
सदर उपक्रम कार्यकारी प्राचार्य डॉ. एस. एम. शेकोकार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन डॉ. कुलजीत कौर गिल व सहयोगी प्राध्यापकवृंदाने केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एन.सी.सी. कॅडेट्सनी दाखवलेली उत्स्फूर्ती आणि सामाजिक बांधिलकी निश्चितच अनुकरणीय आहे.

  Post Views:   96



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी