शिष्यवृत्ती परिक्षेत ने.हि. कन्या विद्यालयाच्या विद्यार्थाीनींचे सुयश

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
 नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालय ब्रह्मपुरी येथील वर्ग पाचवीची विद्यार्थिनी कु. जिया सचिन झरकर तसेच वर्ग आठवीच्या कु. राजश्री संजय आंबोरकर, कु. अक्षरा अमित मेश्राम यांनी महाराष्ट्र शासन आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून विद्यालयाच्या नावलौकिक वाढवला आहे. 
 विशेष म्हणजे राजश्री आंबोरकर हिने नुकत्याच झालेल्या एनएमएमएस स्कॉलरशिप परीक्षेत शिष्यवृत्ती मिळवली आहे. सदर शिष्यवृत्ती ही विद्यार्थिनींना सलग तीन वर्षे मिळणार असून विद्यार्थिनींच्या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशानिमित्य संस्थेचे सचिव अशोकजी भैया सर, मुख्याध्यापिका पी.व्ही. बनपुरकर, उपमुख्याध्यापक निखारे सर, पर्यवेक्षिका खंडाते मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
 विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व विद्यालयातील शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन यांना दिले आहे. नुकत्याच झालेल्या एनएमएमएस परीक्षेत नऊ विद्यार्थिनींची स्कॉलरशिपसाठी व शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थिनींनी मिळवलेल्या सुयशामुळे विद्यालयात प्रेरणादायी व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

  Post Views:   50



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी