विद्यार्थ्यांना वनभ्रमंती करवून जागतिक वन दिन साजरा

नागभीड येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचा उपक्रम
   

नागभीड/प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना वनभ्रमंती करवून व जंगली प्राणी तसेच विविध पक्षांविषयी माहिती देऊन नागभीड येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कार्यालय व एकारा (भुज) आश्रम शाळा यांच्या संयुक्त विघमाने शुक्रवारला एकारा येथिल वनविश्रामगृहाच्या परिसरात जागतीक वनदिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नागभीडचे सामाजिक वन परिक्षेत्र अधिकारी ए. व्हि. सोनडवले, ब्रम्हपुरीचे दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी राम शेंडे, वनरक्षक कल्याणी रणदिवे, साहाय्यक शिक्षक नरेश चौधरी, विशेष तज्ञ ललित उरकुडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी परीसरातील पर्यावरण सबंधी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यानंतर तलाव सभोवताल वनभ्रमंतीसाठी विद्यार्थ्यांना पायदळ फिरवून पक्षांचा आकारमान, आवाजावरुन पक्षांची ओळख, प्राण्यांच्या पाऊल खुनावरुन प्राण्यांची ओळख, वृक्षांची ओळख, वृक्षांचे महत्व व फायदे तसेच पाण्याचे महत्व, वन ओषधी, वृक्ष तोड, वनवा, मानव व वन्यजीव यांच्या मध्ये होणारे संघर्ष इत्यादी विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन ए. व्हि. सोनडवले यांनी केले. प्रसंगी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारून अचूक उत्तरे देणार्‍या दोन विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. आभार प्रदर्शन वनरक्षक कल्यानी रणदिवे यांनी केले.

  Post Views:   18



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी