ने.हि.महाविद्यालयातील प्रा. प्रफुल्ल परातेंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
ब्रह्मपुरी :-
ब्रम्हपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील गणित विषयाचे प्रा.प्रफुल्ल पराते यांनी डाअट चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित शिक्षक कर्मचारी - अधिकारी स्पर्धेतील 'एम एस वर्ड व एम एस एक्सेल' या स्पर्धाप्रकारात विभाग स्तरावर नागपूर विभागातून प्रथम क्रमांक पटकावला असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झालेली आहे.
संगणक विषयातील त्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे व तांत्रिक कौशल्यामुळे त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे
सचिव अशोक भैया, प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर, आई-वडिल, पत्नी खूशी पराते, बहिण ममता उमरेडकर व इतर प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.