महाराष्ट्र विद्यालयाची "शर्वरी" नवोदय विद्यालय परिक्षेत उत्तीर्ण

   

ब्रम्हपुरी/का.प्र.
ब्रम्हपुरी तालुक्यातील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, पिंपळगाव (भोसले) द्वारा संचालित महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगांव (भोसले) येथील वर्ग ५ ची विद्यार्थिनी कु. शर्वरी दिगांबर उरकुडे हिची चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी (बाळापुर) येथील जवाहर नवोदय विद्यालय वर्ग ६ करिता नुकत्याच घोषित झालेल्या निकालात पात्र ठरली आहे.
महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव (भोसले) च्या वतीने मुख्याध्यापक ओमप्रकाश बगमारे यांनी व शिक्षकांनी तिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि तिच्या पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या. शर्वरीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तथा मार्गदर्शक शिक्षक व शाळेतील सर्व शिक्षकांना दिले.

  Post Views:   51



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी