बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समर्थनार्थ वंचितच्या पदाधिकार्याआची अनोखी स्वाक्षरी मोहिम

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
ब्रम्हपुरी येथे बौद्ध मंगल परिणयाला उपस्थित राहुन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा आयटी सेलप्रमुख लिलाधर वंजारी यांनी अनोख्या पध्दतीने स्वाक्षरी मोहिम राबविली. 
बुध्दगया येथे सुरु असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौध्द महासभा यांच्या वतीने सुरु असलेल्या स्वाक्षरी मोहिमेला बळ देण्यासाठी हि अनोखी पध्दत राबविण्यात आली. यावेळी वर प्रजोत तेलंग व वधु शताब्दी सेवक देवगडे यांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी करुन आपले सामाजिक दायित्व व कर्तव्य पुर्ण केले. शिवाय यावेळी शेकडो बौध्द बांधवांनी स्वाक्षरी करुन महाविहार मुक्ती आंदोलनास पाठींबा जाहीर केला. यावेळी उपस्थितांनी वंचितच्या या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

  Post Views:   30



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी