महात्मा फुले व डॉ. आंबेडकर जयंतीचे आयोजन
ब्रम्हपुरी/का.प्र.
राष्ट्रपिता महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती बहुजन विचार मंच ब्रम्हपूरी द्वारा झांसी राणी चौक राजर्षी शाहू महाराज विचार परिसरात साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्य दि. १२ एप्रीलला जाहिर व्याख्यान कार्यक्रम आयोजित केले असुन बहुजन समाजाच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय अधःपतनाची कारणे व त्या वरील उपाय या विषयावर प्रसिद्ध विद्रोही विचारवंत गोविंददादा पोलाड, अकोला यांचे व्याख्यान होणार असुन वर्तमान मिडीयाने निर्माण केलेल्या चंगळवादी वृत्तीमुळे बहुजनांचे वैचारीक होत असलेले खच्चीकरण या विषयावर प्रसिद्ध सत्यशोधक विचारवंत डॉ. अभिलाशा गावतुरे (बेहरे) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
व्याख्यानाचे अध्यक्ष प्रा. संजय वाळके फुले शाहु आंबेडकरी विचारवंत ब्रम्हपूरी हे राहणार आहेत. या परिसंवादाचे उद्घाटक जगदिश पिलारे अध्यक्ष शिवछत्रपती फाउंडेशन ब्रम्हपूरी तथा डॉ. शिशिर वंजारी डायरेक्टर हार्टकेअर हॉस्पीटल ब्रम्हपूरी हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हनुन प्रा. डॉ. राकेश तलमले सचिव रयत शिक्षण संस्था ब्रम्हपूरी तथा इंजि. राजेश मेश्राम उप कार्यकारी अभियंता महावितरण ब्रम्हपूरी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. दिनांक १३ एप्रील २०२५ ला संगितमय कार्यक्रमाचे आयोजन असुन वादळ निळ्या क्रांतिकारकांचे हा संगितमय कार्यक्रम महाराष्ट्राचे प्रसिद्ध प्रबोधनकार लोमहर्ष कावळे सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटनिय सत्राचे अध्यक्ष संजय मगर संचालक स्टडी सर्कल अकॅडमी हे राहणार आहेत. उद्घाटक प्रा. देवेश कांबळे सचिव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपूरी हे उपस्थित राहणार आहेत. सदर दोन्ही दिवस वैचारिक प्रबोधन सादर होणार असुन दि. १४ एप्रीलला शिस्तबद्ध पणे रॅली काढुन अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजक बहुजन विचार मंचद्वारे केले आहे.