सिध्दी ला व्हायचं आहे सी.ए.

   

जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची इच्छा असेल तर आपण आपल्या जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय ब्रम्हपुरी शहरातील लाडकी लेक सिद्धी पटेल हिच्या यशाच्या माध्यमातून आला आहे. पूर्व विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रचलित असलेल्या ब्रम्हपुरीतील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सिद्धी अशोक पटेल हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेत वाणिज्य विभागातून ९७.१७ टक्के गुण संपादित करून तालुक्यात व जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला. सिद्धी पटेलच्या या कामगीरीमुळे ब्रम्हपुरी तालुक्याच्या व नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.  
 सिद्धी पटेल ही विद्यार्थीनी पहिल्यापासूनच हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. तिचे शालेय शिक्षण ख्रिस्तानंद स्कूल ब्रम्हपुरी येथे झाले. दहावीतही तिने आपल्या हुशारीची चुणूक दाखविली होती. त्यावेळी तिने ९१ टक्के गुण मिळविले होते. दहावीत सर्वोत्कृष्ट गुण मिळाले असल्यामुळे तिने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. महाविद्यालयातील शिकवणीवरच भर देत अभ्यास करण्यास सुरुवात केली. जेव्हा अभ्यास करायचा मन झालं, त्या वेळेस अभ्यास करायचं या नेमाने तिने अभ्यास करून हे यश संपादन केले आहे. याकामी तिला आई-वडिलांचे प्रोत्साहन व महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. सिद्धी पटेल हिला प्रथम पदवी प्राप्त करायची आहे, त्यानंतर ती सीए किंवा स्पर्धा परिक्षेतून अधिकारी व्हायचे तिचे स्वप्न ती पूर्ण करणार आहे. तिचे वडील अशोक पटेल हे वूड व्यवसायीक आहेत; तर आई गृहिणी आहे.

  Post Views:   58



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी