रोशना मस्केंना भौतिकशास्त्रात आचार्य पदवी प्रदान

   

ब्रह्मपुरी
   येथील ने हि महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थिनी रोशना मस्के यांना गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीने "आचार्य पदवी " नुकतीच प्रदान केली त्यांच्या प्रबंधाचा विषय "सिंथेसिस अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ इनऑरगानीक फॉस्पर फॉर एसएसएल अप्लिकेशन बाय युजिंग वेट केमिकल मेथड अँड कम्बंशन " हा होता आणि डॉ अतुल येरपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडवाना विद्यापीठाला प्रबंध त्यांनी सादर केला होता.
    या संशोधन प्रवासात त्यांनी प्रतिष्ठित स्कोपस-इंडेक्स जर्नल्समध्ये १० शोधनिबंध प्रकाशित केले. ज्यात वैज्ञानिक समुदायातील तिच्या कामाची गुणवत्ता जाणि प्रभाव अधोरेखित केलेला आहे.संशोधन कार्य करीत असतांना महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य, डॉ एस एम शेकोकर,डॉ एन एस कोकोडे,डॉ डि एच गहाणे,डॉ.रतन मेश्राम, प्रा.डी.एम परशुरामकर,विलास खोब्रागडे व रोशन डांगे यांनी वेळोवळी त्यांना मार्गदर्शन केले.आचार्य पदवी मिळाल्याबद्दल रोशना मस्केंनी आई, वडील, पती आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचे व गुरुजनांचे मनापासून आभार मानले.

  Post Views:   71



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी