खेड केंद्राची शिक्षण परिषद कहाली शाळेत संपन्न
ब्रम्हपुरी/का.प्र.
पंचायत समिती ब्रम्हपुरी अंतर्गत खेड केंद्राची शिक्षण परिषद दिनांक २१ मार्चला जि.प.उच्च प्राथमिक शाळा कहाली येथे संपन्न झाली. यावेळी मयुर लाडे गटशिक्षणाधिकारी, सुधीर अलोने मुख्याध्यापक खंडाळा, रविंद्र मेश्राम विषय शिक्षक खेड, संदिप पडोळे गटसाधन व्यक्ती यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम सावित्रीमाई फुले यांच्या फोटोला दीप प्रज्वलित करून व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर मार्गदर्शक सुधीर अलोने मुख्याध्यापक खंडाळा यांनी उपस्थित शिक्षकाना निपुण भारत कृती कार्यक्रमातील उपक्रमाबाबत व इतर विषयांवर मार्गदर्शन केले. रविंद्र मेश्राम विषय शिक्षक खेड यांनी नवभारत साक्षरता अभियान मूल्यमापन तसेच शाळा मानक पुरावे या विषयावर संवाद साधून मार्गदर्शन केले. मयुर लाडे गटशिक्षणा-धिकारी यांनी निपुण भारत कृती कार्यक्रम, नवभारत साक्षरता अभियान, या विषयांचा आढावा घेऊन योग्य असे मार्गदर्शन केले.
संचालन व आभार प्रदर्शन अल्का भुते शिक्षिका कहाली यानी केले.