ने.हि. विद्यालयाच्या पारस टिकलेचे शिष्यवृत्ती परिक्षेत गौरवपूर्ण यश

   


ब्रह्मपुरी/का.प्र.
 येथील नेवजाबाई हितकारिणी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रह्मपुरी येथील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी पारस टिकले याने महाराष्ट्र शासन आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करून विद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे.
 पारस टिकले हा अत्यंत हुशार व परिश्रमी विद्यार्थी असून, याआधीही त्याने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत पात्रता मिळवली होती. त्याने अपार मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास व शिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर हे यश मिळवले आहे. पारसच्या या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 त्याच्या या यशानिमित्ताने संस्थेचे सचिव अशोकजी भैय्या, मुख्याध्यापक के.एम. नाईक सर, उपमुख्याध्यापक ए. डब्ल्यू. नाकाडे सर, पर्यवेक्षक पी.आर. जीभकाटे सर तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी त्याचे हार्दिक अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पारसने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांचे प्रेमळ सहकार्य आणि शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन यांना दिले आहे. त्याच्या यशामुळे विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.

  Post Views:   30



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी