कोतवाल संघटनेचा राज्यस्तरीय आंदोलनाला पाठिंबा

चतुर्थ श्रेणीच्या मागणीकरीता मुंबईत बेमुदत आंदोलन
   

ब्रम्हपुरी/का.प्र.
महसूल विभागामध्ये कार्यरत असलेल्या कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन चतुर्थ वेतनश्रेणी देण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या वतीने गुरुवारपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत कामबंद आणि धरणे आंदोलन सुरू आहे. या बेमुदत आंदोलनाला पाठिंबा देत ब्रम्हपुरी तालुक्यातील कोतवाल सहभागी झाल्याने महसूल विभागातील अनेक कामे ठप्प झाली आहेत. 
राज्यातील महसूल सेवक (कोतवाल) यांची गेली गेल्या चाळीस वर्षापासून चतुर्थ श्रेणीची मागणी अजून पर्यंत शासनाने पूर्ण केलेली नाही. चतुर्थश्रेणीची मागणी पूर्ण न करता याउलट सन २००६ पासून दहा टक्के मानधनवाढ लागू केल्याने राज्यातील महसूल सेवकांवर अन्याय झाला आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पामध्ये कोतवालांना चतुर्थ श्रेणी वेतनश्रेणी मंजूर व्हावी, यासाठी राज्यभरातून महसूल सेवक (कोतवाल) संघटनेच्या वतीने शासनाला निवेदन दिले होते. 
१९ मार्चपर्यंत कोतवाल संघटनेच्या मागण्या मान्य न केल्याने दिनांक २० मार्चपासून राज्यातील सर्व महसूल सेवक (कोतवाल) आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत कामबंद आंदोलन व धरणे आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनात ब्रम्हपुरी तालुक्यातील कोतवाल सहभागी झाल्याने महसूल विभागातील गावपातळीवरील अनेक कामे ठप्प पडली आहेत.

  Post Views:   44



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी