विद्यानगरात नळाच्या पाण्यासाठी हाहाकार

पाणीपुरवठा पुर्ववत करण्याची नागरिकांची मागणी
   

ब्रम्हपुरी/का.प्र.
  ब्रम्हपुरी नगर पालिकेच्या वतीने शहरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून ब्रम्हपुरी नगरपालिकेच्या वतीने नळ कनेक्शनद्वारे करण्यात येणार्याा पाणी पुरवठ्याचा कालावधी अत्यंत कमी करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यानगर वार्डातील अनेक कुटूंबाना घरघूती वापरासाठी व पिण्यासाठी पाण्याची अडचण निर्माण झाली आहे.
 ब्रम्हपुरी शहर हे शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, वैद्यकिय व औद्योगिक नगरी म्हणून प्रचलित आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ब्रम्हपुरी शहराला पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवठा करण्याचे काम ब्रम्हपुरी नगर पालिकेच्या वतीने करण्यात येते. मात्र, विदर्भात सर्वात उष्ण शहर म्हणून ब्रम्हपुरीची ओळख असतांना, याच शहरात पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. भर उन्हाळ्यात नगर पालिके मार्फत नळ कनेक्शनद्वारे करण्यात येणार्याम पाणी पुरवठ्याचा कालावधी कमी केल्यामुळे विद्यानगर वार्डातील अनेक कुटूंबाना घरगुती वापरासाठी व पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. शिवाय अनेक कुटूंब हे भाड्याच्या घरात किरायाने राहत असल्यामुळे कुणाला केवळ पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते. तर कुणाच्या नशीबी एक हंडा पाणी देखील मिळत नसल्याच्या तक्रारी ऐकावयास मिळत आहेत. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत ब्रम्हपुरी नगर पालिकेने पाणी पुरवठा करण्याचा कालावधी कमी केल्यामुळे अनेकांना बाहेरील कॅनचे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे कॅनचे पाणी हे पिण्याच्या गुणवत्तेचे आहे की कसे याबाबत नागरिक अनभिज्ञ आहेत. सदर बाहेरील कॅनचे पाणी पिण्यासाठी वापरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यास, त्यास ब्रम्हपुरी नगर पालिका सर्वस्वी जबाबदार रहाणार? की कोण असे एक नव्हे अनेक प्रश्न सुज्ञ नागरिक विचारत आहेत. शिवाय उन्हाळ्यात शहराचे तापमान अधिक असल्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी कुलरचा आधार घ्यावा लागतो, परंतु पाण्याची अडचण निर्माण झाल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वणवन भटकावे लागत आहे. ब्रम्हपुरी नगर पालिकेने पाणी पुरवठा करण्याचा कालावधी पूर्ववत करावा, अशी मागणी विद्यानगर येथील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

  Post Views:   124



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी