पिंपळगांव भो. येथे श्रीराम जन्मोत्सव

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीकाठी वसलेले भाजीपाला, धान पिकासाठी प्रसिध्द, सात हजार लोकसंख्येचे पिंपळगाव भोसले येथे सनातन काळापासुन आज ही सर्वजाती धर्माचे पक्ष भेद बाजुला ठेवुन गुण्यागोविंदाने लोक राहतात. गावात आजही श्रीराम जन्मोत्सवाची परंपरा जपली जात असुन गुडीपाडवा सणापासुन येथील हनुमान मंदीर पेठवार्ड, आडकुजी बाबा व पाजीबाबा या तिन्ही मंदीरात आठ दिवस सायंकाळी हरीपाठ तर सकाळी समस्त गावात रामधुन काढली जाते. 
तेव्हापासून नवव्या दिवशी पांजीबाबा, आडकुजी बाबा, हनुमान मंदीर पेठवार्ड श्रीराम जन्म उत्सव मोठ्या थाटामाटात ढोल ताशाच्या गजरात रामाचा जन्म उत्सव करुन सकाळ पासुन भक्त गण यात्रेकरुसाठी महाप्रसाद, सायंकाळी विवाहसोहळा, रात्रोला किर्तन, सात खंजरी महाराजाचे भजन आणि रात्री भोजन व्यवस्था करुन श्रीरामाची पालखी काढल्या जाते.  यासाठी तालुक्यातील नव्हे विदर्भातील भक्त गण हजारोच्या संख्येने उपस्थीत राहून रामनवमी, श्रीराम जन्मोत्सव शांततेत पार पडते.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक गौरव भैय्या, पोलीस निरिक्षक प्रमोद बानबले, सरपंच सुरेश दूनेदार पिंपळगाव, माजी सरपंच सुनिल धांडे, पत्रकार गोवर्धन दोनाडकर ब्रम्हपुरी, माजी सरपंच मनोज ढवळे अर्हेर नवरगाव, अनंता उरकुडे, डॉ.पारेश सेलोकर, माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, अण्णाभाऊ ठाकरे, मुख्याध्यापक ओमप्रकाश बगमारे, गडे साहेब, दोनाडकर काकाजी, केशव भुते, गुड्डू बागमारे, मधुकर मेश्राम पत्रकार आदींसह गावकरी व भक्तगण उपस्थित होते.

  Post Views:   82



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी