शेतातील साहित्य चोरी करणारे आरोपी पोलिसांचे ताब्यात

ब्रह्मपुरी पोलिसांची कामगिरी
   

ब्रम्हपुरी 
          फिर्यादी नितीन नगराळे वय 52 वर्ष राहणार देलनवाडी वार्ड, ब्रह्मपुरी यांनी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार 05 जून 2025 ला दिवसभर शेतात काम करून आपले घरी हजर होते. दुसऱ्या दिवशी दिनांक 06 जून 2025 रोजी शेजारील शेती मालक वैद्य यांनी फिर्यादी नगराळे यांना फोन करून सांगितले की, तुमच्या शेतीतील घराचा दरवाजा च्या कुलूप कोंडा तुटलेला असल्याची माहिती दिली. सदर ठिकाणी फिर्यादी नगराळे यांनी जाऊन पाहिले असता, शेतीतील घराचा समोरील दाराच्या कुलूप तोडून पडलेला दिसून आला. फिर्यादी नगराळे यांनी आत जाऊन पाहिले असता, घरातील पाच धानाचे पोते किंमत 10,000 रुपये, तीन ताराचे बंडल किंमत 3000 रुपये, एक पिल्लू पंप मशीन किंमत 1000 रुपये असा एकूण 14,000 रुपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने शेतीतील घरातील दाराचा कुलूप कोंडा तोडून चोरून नेला. फिर्यादी नगराळे यांनी ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपराध क्रमांक 247/025 कलम 305 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद केला.
        याबाबत ब्रह्मपुरी पोलिसांनी गोपनीय मुखबीरा द्वारे गुन्हेशोध पथकातील अंमलदार यांनी शोध घेतला असता, एका मोटर सायकल वर एकूण 2 इसम हे मेंढा किरमिठी ता.नागभीड येथे साहित्य घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. ब्रम्हपुरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता, यातील आरोपी सुनील नवघडे वय 39 वर्ष, उमेश मेश्राम वय 26, दोन्ही राहणार अड्याळ ता. ब्रह्मपुरी यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे आणण्यात आले. आरोपी यांच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेले एकूण 05 धान्याचे पोते किंमत 10.000 रुपये, 03 तारेचे बंडल किंमत 3,000 रुपये, एक टिल्लू पंप मशीन किंमत 1000 रुपये, 01 समर्सिबल मोटार पंप किंमत 2,000 रुपये, 01 टिल्लू पंप मशीन किंमत 2000 रुपये, 15 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ किंमत 4000 रुपये, गुन्ह्यात वापरलेले जुनी वापरतील मोटर सायकल किंमत 30,000 रुपये असा एकूण 52,000 रुपये चा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला. 
      सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, सा. अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनात सहा. पो. नि. मनोज खडसे, पोहवा योगेश शिवणकर, पोहवा अजय कटाईत , पोशी स्वप्निल पळसपगार, चंदू कुरसंगे, इरशाद शेख निलेश तुमसरे यांनी केलेली आहे.

  Post Views:   2043



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी