आयटकचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विशाल धरणे व निदर्शने

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
 आयटकच्या वतीने चार श्रम संहिता रद्द करा, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मागे घ्या, योजना कर्मचार्यां ना शासकीय कर्मचार्यांीचा दर्जा द्या, किमान वेतन लागू करा, पेन्शन देण्याचा कायदा मंजूर करा या व इतर मागणी साठी आयटक चे राज्य सचिव कॉ विनोद झोडगे पाटील, जिल्हा अध्यक्ष दिलीप बर्गि व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य रवींद्र उमाटे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर दिनांक २ २ एप्रिल २०२५ रोजी विशाल धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले.
   केंद्र व विविध राज्य सरकारे कामगाराचे दमन करणारे ४ नवीन कायदे तयार करून लागू करण्याचा जो प्रयत्न चालू केले आहे. त्या विरोधात आयटक राज्य सचिव कॉ. विनोद झोडगे, कॉ.दिलीप बर्गि, भाकप नेते प्रा नामदेव कनाके, कॉ.प्रकाश रेड्डी, संयुक्त खदान मजदुर संघ नेते कॉ.एन.टी.म्हस्के, दिलीप कनकुलवार, वीज कामगार फेडरेशन नेते प्रकाश वानखेडे, राज्य कर्मचारी संघटना नेते शालिक माऊलीकर, राजू गईनवार, प्रदीप चिताडे, कृषी मित्र संघटना अध्यक्ष किशोर निब्रड, निकिता नीर, किरण धोंगडे, श्रीधर वाढई, कुंदा कोहपरे, अरुण भेलके इत्यादी कामगार नेत्यांनी धरणे आंदोलनाला संबोधित केले.

  Post Views:   27



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी