भगतसिंग, सुखदेव, राजगुरू स्मृतीदिनी अभिवादन कार्यक्रम
ब्रह्मपुरी/का.प्र.
शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मृतिदिनानिमित्त ब्रह्मपुरी शहरात असलेल्या पेठवार्ड येथील भगतसिंग यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी विविध मान्यवरांनी उपस्थित राहून महान क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण केली. सामाजिक कार्यकर्ते विहार मेश्राम, भीम आर्मी तालुका अध्यक्ष प्रभू लोखंडे, भीम आर्मी तालुका महासचिव नागेश चहांदे, लक्ष्मी फिजिकल अकॅडमीचे संचालक प्रफुल नागापुरे, अमित रामटेके, ललित धोंगडे तसेच अनेक नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांच्या विचारांवर चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी क्रांतीकारकांचा संघर्ष आणि आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांवर चालत समाज आणि देशासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. उपस्थितांनी मोठ्या उत्साहाने शहीद भगतसिंग अमर रहे, सुखदेव-राजगुरू अमर रहे अशा घोषणा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.