साहेब, दोन वेळच्या खायचे लाले पडताहेत हो.. आता तुम्हीचं सांगा आम्ही जगायचं कसं?

रस्त्याचा विकासकाम ठरतोय त्यांना जगण्यासाठी अडसर
   

ब्रम्हपुरी / महेश पिलारे 

           गेल्या चार महिन्यांपासून रस्त्याचा काम चालू आहे. काम सुरू असल्यामुळे रस्त्यावरची धूळ सतत दुकानातील मालावर साचत असते. रोज दिवसभर मालावरची धूळ साफ करावी लागते. रस्त्याचा काम सुरू असल्यामुळे ग्राहक संख्या कमी झाली आहे. कधी धंदा होते, तर कधी काहीच धंदा होत नाही. धंद्याच्या भारोश्यावर घर चालते. पैसे आल्यावरच घरात चूल पेटते, अन्यथा आसवांचा हुंदका गिळून झोपावे लागते. साहेब, दोन वेळच्या खायचे लाले पडताहेत हो. आता तुम्हीचं सांगा, आम्ही जगायचं कसं? असा सवाल करीत तो पाणावलेल्या डोळ्यांनी आपली करुण कहाणी सांगत होता. ही व्यथा आहे, भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी स्वाभिमानाने धडपड करणाऱ्या मोहम्मद शेख यांची. 
        ब्रह्मपुरी शहरातील विद्यानगर वॉर्ड येथील रहिवासी मोहम्मद हमीद शेख. वय वर्षे ५६. त्यांचे ब्रम्हपुरी - वडसा महामार्गावरील बारई तलाव लगत फुटपाथवर चष्मे व गॉगल विकण्याचा दुकान आहे. दुकानातील धंद्याच्या भारोश्यावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. हातावर आणणे आणि पानावर खाणे हा त्यांचा नित्यक्रम. परंतु गेल्या अनेक महिन्यापासून ब्रह्मपुरी - वडसा राष्ट्रीय महामार्गाचे विकासकाम सुरू असल्यामुळे, हा राष्ट्रीय महामार्ग त्या कुटुंबाच्या जगण्यासाठी अडसर ठरला आहे. 
       मोहम्मद शेख यांना एक पत्नी, दोन मुली व एक मुलगा असं कुटुंब आहे. त्यांच्या दोन्ही मुली उच्चशिक्षित असून कामाच्या शोधात आहेत. तर मुलगा लहान असून तो वडील मोहम्मद यांना दुकान कामात मदत करतो. मोहम्मद शेख यांना स्वतःचे घर नसून, ते किरायच्या घरात राहतात. ना शेती, ना वाडी. केवळ, धंद्याच्या भारोश्यावर संपूर्ण कुटुंबाचा गुजारा आहे. ते सांगतात की, 'गेल्या चार महिन्यांपासून रस्त्याचा काम चालू आहे. काम सुरू असल्यामुळे रस्त्यावरची धूळ सतत दुकानातील मालावर साचत असते. रोज दिवसभर मालावरची धूळ साफ करावी लागते. रस्त्याचा काम सुरू असल्यामुळे ग्राहक संख्या रोडावली आहे. कधी धंदा होते, तर कधी काहीच धंदा होत नाही. धंद्याच्या भारोश्यावर घर चालते. पैसे आल्यावरच घरात चूल पेटते, अन्यथा आसवांचा हुंदका गिळूनच झोपावे लागते. साहेब, दोन वेळच्या खायचे लाले पडताहेत हो. आता तुम्हीचं सांगा, आम्ही जगायचं कसं? एके काळी याच महामार्गावरील फुटपाथ दुकानातून आम्हाला चांगले उत्पन्न मिळून आमचे कुटुंब आनंदात असे. मात्र, सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या विकास कामातून निर्माण झालेल्या समस्येमुळे कुटुंबावर अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे' असं पाणावलेल्या डोळ्यांनी मोहम्मद शेख आपली करुण कहाणी सांगितली. 
         भाकरीत चंद्र शोधण्यासाठी मोहम्मद शेख यांना इकडे तिकडे धडपड करावी लागत आहे. शिवाय धंद्यासाठी घेतलेले कर्ज त्यांच्या माथी बसूनच आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामामुळे फुटपाथची व धुळीची समस्या उद्भवली असून, त्यामुळे ग्राहक संख्या मंदावली आहे. परिणामी, राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज कुठून फेडणार? पोटाची खळगी कशी भरणार? मुलीचे लग्न?असे एक नव्हे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभे आहेत. या उद्भवलेल्या समस्येमुळे मोहम्मद यांच्या समोर जगावं की मरावं, असा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यवसाय करून स्वाभिमानाने जगणाऱ्या मोहम्मद शेख यांना समाजाच्या आधाराची नितांत गरज आहे. तरचं ते या परिस्थितीतून बाहेर पडू शकतील, अन्यथा चुकीचं पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
      ब्रह्मपुरी तालुक्यातील राजकारणी, प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवी संस्था, दानशूर व्यक्तींनी फूटपाथवर जीवन जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मोहम्मद शेख यांना मदतीचा हात दिल्यास, त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र खरे आहे.

  Post Views:   542




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी