योग हा जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे – डॉ. सुभाष शेकोकर

   

ब्रम्हपुरी: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पतंजली योग समिती, नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरी, NCC युनिट व NSS युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला.
     योगाची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. ऋषी-मुनींनी वेदांमध्ये त्याचे अलौकिक महत्त्व विशद केले आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाश्चात्य देशातही योगाचे महत्त्व पटवून दिले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे आज जगभर २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.
      योगाचे मानवी जीवनात अनेक फायदे आहेत. "करो योग, रहो निरोग" या उक्तीप्रमाणे, आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये योग हीच आरोग्यपूर्ण जीवन जगण्याची खरी शैली असली पाहिजे, असे मार्मिक मार्गदर्शन डॉ. सुभाष शेकोकर यांनी केले. हा कार्यक्रम नेवजाबाई भेया हितकारिणी शिक्षण संस्था, ब्रम्हपुरीचे सन्माननीय सचिव श्री. अशोकजी भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
    कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मा. सतीश मासाळ (तहसीलदार, ब्रम्हपुरी)
मा. प्रमोद बानबले (पोलीस निरीक्षक, ब्रम्हपुरी)
डॉ. एम. एस. वरभे (प्राचार्य, शांताबाई भेया महिला महाविद्यालय),मेजर विनोद नरड, योग शिक्षक श्री. भगवान पालकर, नरेश ठक्कर, श्री. सुरेश तलमले (पतंजली योग समिती, ब्रम्हपुरी), कॅप्टन डॉ. कुलजीत कौर गील, कॅप्टन प्रा. अभिजित परकरवार
,डॉ.प्रकाश वट्टी (रासेयो कार्यक्रम अधिकारी),कार्यक्रमात श्री. भगवान पालकर यांनी हसत-खेळत योग, प्राणायाम व ध्यान याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. श्री. नरेश ठक्कर यांनी पंच सामाजिक तत्वे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.   कार्यक्रमाचे संचालन कॅप्टन डॉ. के. के. गील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. प्रकाश वट्टी यांनी केले.
कार्यक्रमाला NCC कॅडेट्स (गर्ल्स व बॉईज), स्वाभिमानी संघटना, ब्रम्हपुरी शहरातील योगाचार्य, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. शेषराज खेडकर, संजय मेश्राम, कॅडेट कावेरी पारधी, नंदिनी टुम्मे, आकांक्षा मेश्राम यांनी मोलाचे योगदान दिले.

  Post Views:   71



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी