ब्रम्हपुरी जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने पहलगाम हल्ल्यातील मृतकांना श्रध्दांजली

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
 ‘ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे’ या मागणीसाठी सातत्याने संघर्ष करणारे ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीने दिनांक १ मे जागतिक कामगार दिवस व महाराष्ट्र दिनानिमित्त स्थानिक विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 
 या बैठकीला सुरुवात करण्याआधी भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर येथील पहेलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला त्या मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली. त्यानंतर जिल्ह्याच्या मागणीसाठी पुढील उपाय योजना आणि आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी साधक बाधक चर्चा करून मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना शिष्टमंडळादवारे निवेदन देणे, जून महिन्यात संघटनेची विस्तारीत बैठक घेऊन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देणे, जुलै महिन्यात धरणे आंदोलन करणे व ऑगस्ट महिन्यात विद्यार्थांच्या सहभागाने विशाल मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधून घेणे असे सर्वानुमते नियोजन करण्यात आले. 
 या बैठकीचे अध्यक्ष स्थान जिल्हा निर्माण संघर्ष समितीचे मार्गदर्शक डॉ.देविदास जगनाडे सर यांनी भुषविले. यावेळेस जिल्हा निर्माण संघर्ष समितीचे मुख्य निमंत्रण विनोद झोडगे पाटील, निमंत्रक प्रशांत डांगे, सुयोग बाळबुध्दे, रक्षित रामटेके, हर्षद निनावे, दत्तू टिकले, सुरज विखार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

  Post Views:   32



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी