काँग्रेस पक्षाकडून निश्चीत उमेदवारांची यादी जाहीर

एकुण २३ पैकी १४ उमेदवार जाहीर
   

ब्रम्हपुरी /महेश पिलारे
           
        ब्रम्हपुरी नगर पालिकेची निवडणूक ०२ डिसेंबरला पार पडणार आहे. १० नोव्हेंबर २०२५ काल पासून उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ब्रम्हपुरी नगर पालिकेच्या निवडणूकीत नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस व भाजपा कडून निश्चीत उमेदवाराचे नाव अद्यापही उघड करण्यात आले नाही. काँग्रेस पक्षाकडून प्रतिष्ठीत व्यापारी तथा ब्रम्हपुरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष योगेश मिसार व उद्योजक डॉ नितीन उराडे यांचे नाव चर्चेत आहे. आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाकडून निश्चीत नगरसेवक पदाच्या उमेदवारांची निश्चीत यादी जाहीर करण्यात आली. यात एकुण २३ उमेदवारपैकी १४ निश्चीत उमेदवारांची घोषणा काँग्रेस पक्षाने केली आहे.
         यात प्रभाग क्रमांक १ (अ)काजल राजेश तलमले, (ब) चंद्रकांत ज्ञानेश्वर बावणकुळे, प्रभाग क्रमांक ३ (अ) मनोज कावळे, 
प्रभाग क्रमांक ४ (अ) डॉ. प्रेमलाल मेश्राम (वंचित बहुजन आघाडी), 
प्रभाग क्रमांक ५ (अ) सतिश हुमने, 
प्रभाग क्रमांक ०६ (अ) लता सिंहगडे (वंचित), (ब) मोंटू पिलारे, 
प्रभाग क्रमांक ८ (अ) पुष्पलता सुधाकर पोपटे, 
प्रभाग क्रमांक ९ (अ) अनिल दोनाडकर, (ब) सपना संजय बल्लारपूरे, 
प्रभाग क्रमांक १०(अ) राकेश पडोळे, (ब) ज्योती राऊत, 
प्रभाग क्रमांक ११ (अ) माधुरी सोमेश्वर उपासे, (ब) रंजना बुराडे यांचा समावेश आहे. उर्वरीत नावे लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष खेमराज तिडके यांनी दिली. यावेळी ब्रम्हपुरी शहर काँग्रेसचे हितेंद्र राऊत, सुधाकर पोपटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  Post Views:   3924




संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी