प्रा. राजेंद्र राचलवार यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा
ब्रह्मपुरी/का.प्र.
येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रा. राजेंद्र राचलवार, हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापुर्ती निरोप समारंभ रविवार (दि.३०) ला पार पडला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय डॉ. मनोजकुमार डायगव्हाणे हे उपस्थित होते. डॉ. डायगव्हाणे यांनी प्रा. राचलवार यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. त्यांनी आपल्या मनोगतात प्रा. राचलवार हे संस्थेचे आधारस्तंभ असून, त्यांनी आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत अनेक विद्यार्थी घडविले, असे प्रतिपादन केले. यावेळी शासकीय तंत्रनिकेतन, नागपूर येथील प्रा. दुलारी गाढवे, प्रा. रामटेके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.