युपीआय ठप्प!

   



देशात दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी अत्यंत सहजपणे वापरली जाणारी यूपीआय पेमेंट यंत्रणा दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारला काही तांत्रिक कारणामुळे अचानक आणि दीर्घकाळ बंद पडल्यामुळे हजारो लोकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले. जी गैरसोय त्यांना सोसावी लागली त्यामुळे पुन्हा एकदा 'डिजिटलइंडिया' या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये तिसर््यांदा अशा प्रकारची घटना घडल्यामुळे 'डिजिटलइंडिया'चा गवगवा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे त्याचा विचारही करण्याची गरज आहे. 
याआधी २६ मार्चला आणि त्यानंतर २ एप्रिलला सुद्धा अशाच प्रकारे यूपीआय सेवा ठप्प झाली होती. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये सातत्याने सर्वसामान्य नागरिक सुद्धा यूपीआयच्या माध्यमातून दैनंदिन आर्थिक व्यवहार करत आहेत. कोणत्याही मोठ्या किंवा छोट्या शहरात पदपथावर एखादी चहाची गाडी असेलकिंवा वडापावची गाडी असेलकिंवा साधा चहाचा ठेला जरी असेलतरी त्या ठिकाणीसुद्धा १० रुपयाच्या चहासाठी किंवा २० रुपयाच्या रसासाठी पेमेंट करताना यूपीआयचा वापर केला जातो. या पेमेंट पद्धतीच्या लोकप्रियतेमुळे आणि सुलभतेमुळे सर्वसाधारण नागरिकांपैकी बहुतांशी लोक आता खिशात जास्त रोख रक्कम बाळगत नाहीत. 
पेमेंट करणारा आणि पेमेंट घेणारा दोघांच्याही सोयीचा हा व्यवहार असल्यामुळे गेल्या काही वर्षाच्या कालावधीमध्ये ही सर्वात लोकप्रिय आर्थिक व्यवस्था झाली आहे. एका आकडेवारीनुसार भारतात दररोज ५० कोटी लोक यूपीआयचे व्यवहार करतात आणि त्याच्या एकंदर व्यवहाराचा आकडा अब्जावधी रुपयांमध्ये येतो. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातील५० कोटी लोक जर दररोज नियमितपणे यूपीआय प्रणाली वापरत असतीलतर ही प्रणाली विस्कळीत झाल्यावर काय गैरसोय होवू शकते, याचा अंदाजच करायला नको. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत आणि सर्वसाधारणपणे लग्नाची खरेदी करताना जो व्यवहार होतो तो रोख न होता, अशाप्रकारे यूपीआयच्या माध्यमातूनच केला जातो. 
मोठी रोख रक्कम बाळगणे सुरक्षित नसल्याने खरेदीचे मोठे व्यवहार यूपीआय पेमेंटच्या माध्यमातूनच केले जातात. पण या शनिवारी किंवा त्यापूर्वी दोन वेळा यूपीआय यंत्रणा ठप्प झाली तेव्हा हे सर्व व्यवहारही विस्कळीत झाले. ऐनवेळी एटीएम कार्डचा वापर करून एटीएममधून पैसे काढणे किंवा चेक देऊन व्यवहार पूर्ण करणे अशा प्रकारचा पर्याय अनेक लोकांना स्वीकारावा लागला. मोठमोठे मॉलकिंवा मोठमोठ्या दुकानांमध्ये किंवा उन्हाळ्याचा हंगाम असल्यामुळे इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये जेव्हा खरेदीसाठी लोक गेले असतील, तेव्हा पेमेंट करताना अनेकांची गैरसोय झाली असेल. अनेकदा यूपीआय यंत्रणाच ठप्प झाल्यानंतर त्या दिवशीचा व्यवहार करणे शक्य होत नाही. शिवाय मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागते. ज्याप्रकारे यूपीआय पेमेंट पद्धती विस्कळीत झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो त्याच प्रकारे अनेक वेळा जर सरकारी उपक्रमांच्या वेबसाइट्स किंवा अॅेप्स यामध्ये सुद्धा विस्कळीतपणा आला तर सर्वसामान्य नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागतो. सरकारी सेवांचा उपभोग घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी डिजिटलमाध्यमांनाच आता प्राधान्य दिले जाते. अनेक वेळा या सरकारी वेबसाइट किंवा सरकारी अॅणप्सच्या कार्यप्रणालीमध्ये अनेक दोष असतात त्याचा फटकाही अनेकांना बसतो. डिजिटलइंडिया या घोषणेच्या माध्यमातून मोदी सरकारने गेल्या काही वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने व्हावेत यासाठी जरी पुढाकार घेतला असला, तरी तांत्रिक पातळीवरीलपुरेसे पाठबळ अद्यापही या व्यवस्थेला मिळालेले नाही हेच यूपीआय व्यवस्था सलग तिसर्यांअदा ठप्प झाल्याने लक्षात येत आहे.

  Post Views:   21



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी