पायल सहारे हिची इंडियन आर्मीमध्ये निवड

   


ब्रम्हपुरी/का.प्र.
ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव (खुर्द) येथील पायल शांताराम सहारे हिची वयाच्या १९व्या वर्षी इंडीयन आर्मीमध्ये निवड झाली आहे. तोरगाव खुर्दच्या शिरपेच्यात मानाचा तुरा, कोर ऑफ मिलिटरी पोलीस मध्ये निवड होणारी जिल्ह्यातून पहिलीच मुलगी असून वडील शांताराम शेतकरी तर आई गृहिणी आहे. आपल्या ब्रह्मपुरी परिसरामध्ये पायलने आपल्या निवडीमुळे इतरही मुलींना आर्मी बद्दल प्रेरित केले आहे. 
बालपणापासूनच हुशार आणि खेळाडू वृत्तीची असलेल्या पायलने देशसेवेसाठी आपला मार्ग निवडला. आर्मीमध्ये निवड झाल्यानंतर पायलने आपली यशाचे श्रेय लेफ्ट. अभिजीत परकरवार सर २० महाराष्ट्र बटालियन नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरी आणि आपल्या आई-वडिलांना दिले आहे. सैनिक पायल ही एनसीसी कॅडेट असून बीए च्या द्वितीय वर्षाला शिकत होती. तिने अशा पद्धतीने अभ्यास केला की पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घातली. मुला मुलींमध्ये आता पायलने अवघ्या १९ वर्षांत यश गाठले. विशेष म्हणजे पायलने अवघ्या १९ व्या वर्षात या यशाला गवसणी घातली आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

  Post Views:   104



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी