शांतीनगर येथे महिला आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

   

ब्रम्हपुरी/का.प्र.
ब्रह्मपुरी येथील सम्यक बौद्ध विहार नगरात बहुजन वैद्यकीय सेवा मंच व ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी च्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग दिनाच्या औचित्याने शांतीनगर येथील सम्यक बौद्ध विहारात महिला आरोग्य विशेष कॅन्सर रोगनिदान तपासणी शिबिराचे एक दिवसीय यशस्वी आयोजन करण्यात आले. 
दिनांक २७ मार्च २०२५ रोजी दिवसभर पार पडलेल्या या शिबिरात तपासणी समुपदेशक अंजिरा आंबीलडोके ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी यांच्या नेतृत्वात रक्त तपासणी सहकारी अधिकारी सोनाली पानसे, वर्षा सरकार यांच्याकडून महिलांना होणारे स्तन कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, थायराइड टेस्ट, सीबीसी टेस्ट, लिपिड प्रोफाइल इत्यादी विविध चाचण्यांसाठी रक्त घेऊन तपासणी लॅबमध्ये पाठविण्यात आले. 
यामध्ये एकूण ४५ स्त्री पुरुष रुग्णांनी तपासणी शिबिरात रक्त तपासले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. पूनम घोनमोडे यांच्या नेतृत्वात शांती नगरातील सम्यक बौद्ध विहार महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले.

  Post Views:   15



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी