सिध्दी जयंत पराते हिचे सुयश

   

ब्रम्हपुरी/का.प्र.
 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून, ब्रम्हपुरी तालुक्यातील ख्रिस्तानंद स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. सिद्धी जयंत पराते हिने उल्लेखनीय यश मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता प्राप्त केली आहे.
 कु. सिद्धीचे वडील नेवाजाबाई हितकारिणी विद्यालय, ब्रम्हपुरी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सिद्धीचा भाऊ वेदांत पराते यानेही इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवले होते. सिद्धीच्या या उल्लेखनिय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  Post Views:   40



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी