गरीब रूग्णांसाठी धर्मदाय रूग्णालयात खाटा राखीव!
रूग्ण लाभ कां घेत नाही, हा प्रश्न!
ब्रम्हपुरी/का.प्र.
निर्धन व दुर्बल रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार देण्याच्या अनुषंगाने ब्रह्मपुरी तालुक्यात धर्मादाय रुग्णालय उपलब्ध असून त्याचे नाव ख्रिस्तानंद रूग्णालय, ब्रम्हपुरी असून आपली सेवा प्रदान करीत आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यात एक धर्मादाय रुग्णालय आहे. त्यात बर्याच राखीव खाटा आहेत. असे असूनही धर्मादाय रुग्णालयात पाहिजे त्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत नसल्याचे वास्तव आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे एका गर्भवती महिलेला प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर धर्मादाय रुग्णालयातील सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला. ब्रह्मपुरी तालुक्यात एक धर्मादाय रुग्णालय उपलब्ध आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील ख्रिस्तानंद रूग्णालय ब्रह्मपुरी या धर्मादाय रुग्णालयात एकूण १२० खाटा उपलब्ध आहेत. या रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकांसाठी खाटा राखीव ठेवल्याचे दिसून येते. तालुक्यातील निर्धन रूग्णांसाठी एकूण १२ खाटा राखीव आहेत. या रुग्णालयाने दिलेल्या आरोग्य सेवांबाबत सहायक धर्मादाय आयुक्तांकडे वर्षभरात एकही तक्रार नाही. तरीसुद्धा या रुग्णालयात जाणार्यांची संख्या अत्यल्प असल्याचे दिसून येते.
सुविधा कोणाला मिळतात?
निर्धन रुग्णांसाठी वार्षिक १ लाख ८० हजार रुपये उत्पन्न असावे. त्यांना १० खाटा राखीव आहेत. शिवाय पूर्णपणे मोफत उपचार. दुर्बल घटकातील रुग्णांसाठी ३ लाख ६० हजार उत्पन्न मर्यादा असून, १० टक्के राखीत खाटा व संपूर्ण उपचार मोफत दिला जातो. यासाठी शिधापत्रिका, दारिद्ररेषेखालील पत्रिका व वार्षिक उत्पन्नाचे तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
धर्मदाय रुग्णालयांत नेमक्या कुठल्या सरकारी सुविधा मिळतात?
मोफत उपचारांसाठी १२ खाटा राखीव : निर्धन व दुर्बल घटकांसाठी तालुक्यात ब्रह्मपुरीच्या ख्रिस्तानंद रुग्णालयामध्ये अनुक्रमे प्रत्येकी १२ खाटा राखीव आहेत. धर्मदाय रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची चमू रुग्णसेवा देण्यास तत्पर आहे.