ब्रह्मपुरीत २० मे ला भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन.

   

ब्रम्हपुरी प्रतिनिधी :- भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय नागरिकांवर हल्ला केला त्यात २७ भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण जग हळहळले. या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात भारतीयांमध्ये चीड निर्माण झाली. पुन्हा अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले होऊ नयेत व त्यांना धडा शिकवावा ही संपूर्ण भारतीयांची ईच्छा होती. या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत “ऑपरेशन सिंदूर”राबवून अनेक दहशतवाद्यांचे प्रशिक्षण अड्डे, हवाई अड्डे, सायबर हल्ले, तसेच पाकिस्तानने केलेल्या अनेक कारवायांचे प्रतिउत्तर देण्याचे मोठे कार्य भारतीय सेनेने केले. भारतीय सैनिकांच्या शौर्याला व त्यांच्या अतुलनीय पराक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्या कार्याला सलाम करण्यासाठी तसेच शहिदांना अभिवादन करण्यासाठी दिनांक २० मे २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय नागरिकांचे नैतिक कर्तव्य म्हणून संपूर्ण सामाजिक संघटना, राजकीय पक्ष ,विद्यार्थी,नारीशक्ती,यांनी जास्तीत जास्त संख्ये ने भारतीय सैनिकाच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा रॅलीत उपस्थित राहवे व भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

  Post Views:   111



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी