विहार मेश्राम याचे ७ कि.मी. खुल्या मॅरेथॉन स्पर्धेत उत्तम प्रदर्शन

   

ब्रम्हपुरी/का.प्र.
 ब्रम्हपुरी येथील विहार मेश्राम याने दिनांक २७/०४/२०२५ ला सकाळी ०६.३० वाजता संत संताजी जगनाडे महाराज चौक उमरेड येथे ‘ओम साई स्पोर्टिंग क्लब, उमरेड’ यांच्या वतीने आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या गटामध्ये सहभाग घेत, ७ कि.मी. अंतर पार करून यश मिळवले! ही केवळ स्पर्धा नव्हती, तर स्वतःशीच केलेल्या संघर्षाची, जिद्दीची आणि चिकाटीची परीक्षा होती. त्यात तो यशस्वी झाला.
 ‘या स्पर्धेत मी विजयी ठरलो! या प्रवासात मिळालेलं यश हे माझ्या मेहनतीचा आणि सततच्या प्रयत्नांचा गौरव आहे. ही सुरुवात आहे, अजून बरेच शिखरं सरायची आहेत! स्पर्धेतील प्रत्येक क्षणात जिद्द, तयारी आणि आत्मविश्वास यांची खरी कसोटी लागली आणि अखेर कठोर मेहनतीच्या जोरावर यशाचा झेंडा फडकावता आला. ही कामगिरी केवळ वैयक्तिक विजय नाही, तर माझ्या स्वप्नांच्या दिशेने टाकलेलं ठाम पाऊल आहे. या स्पर्धेत यश मिळवताना मिळालेली प्रेरणा आणि पाठिंबा हा पुढील वाटचालीसाठी मोठा बळ देणारा आहे,’ असे तो स्पर्धेविषयी बोलतांना म्हणाला. 
 विहारने त्याला मार्गदर्शन करणारे लक्ष्य अकॅडमीचे संचालक प्रफुल नागपुरे सर, पीआरडी स्पोर्ट चे संचालक राहुल जुवारे सर यांचे मनःपूर्वक आभार मानले असून पुढील आव्हानांसाठी आणखी जोमाने सज्ज असल्याचे सांगितले.

  Post Views:   25



संबंधित बातम्या

ताज्या घडामोडी